धाराशिव (प्रतिनिधी) -येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख बोलत होते. 

प्राचार्य डॉ .जयसिंगरावदेशमुख म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांनी जातीव्यवस्था आणि हिंदू धर्मातील इतर वाईट गोष्टी विरुद्ध संघर्ष केलेला आहे.  संत बसवेश्वर यांचा जन्म इसवी सन 1131 मध्ये वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीया या दिवशी विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या ठिकाणी झाला. संत बसवेश्वर यांनी आठशे वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी लढा दिला . त्याचबरोबर त्या काळात उच्च - नीच भेदभाव खूप दिसून येत होता. ही सामाजिक फाळणी नष्ट करण्यासाठी त्यांनी जातीवादाच्या विरोधात लढा दिल्याचे दिसून येते असे ते म्हणाले. 

याप्रसंगी डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर उपस्थित होते. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ . बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि संजय निंबाळकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून संत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top