तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात तापमान चाळीशी पार केल्याने शहरात उष्णतामान वाढले असल्याने याचा फटका पक्षांना बसत आहे.

येथील निसर्गप्रेमी किशोर पवार यांना घराच्या छतावर बुधवार दि. 22 मे च्या  उष्म्याच्या लाटेमध्ये जखमी पोपट पडलेले आढळले. या पोपटाला उचलुन त्यांचा मुलगा शिवराज याने उपचार करुन पाणी पाजुन व फळे खायला दिली. ठिक झाल्यानंतर पोपटाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळेसची उष्णतेची लाट अत्यंत तिव्र असुन याची झळ वन्यजिव व पक्ष्यांना बसत आहे. सर्वांनी आपल्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे असे आवाहण  निसर्गप्रेमी किशोर पवार केले आहे.

 
Top