तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या वतीने शहरातील दिपक चौकात भाविक नागरिकांसाठी मोफत पाणपोई शुभारंभ करण्यात आला.

या पाणपोयीमुळे तहानलेल्या भाविकांची तृष्णा भागत असल्याने भाविकांमधुन समाधान व्यक्त होत आहे. वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम शुभारंभ करुन कार्यक्रम घेवुन रविवार  दि. 5 मे रोजी साजरा करण्यात आला. प्रभाग क्र 8 येथे उन्हाळ्याच्या दृष्टी कोणातुन सबंध प्रभाग क्र 8 मध्ये दि. 5 मे पासुन मोफत पाणी टँकचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सध्या तीन दिवसाआड पाणी नगर परिषदच्या माध्यमातुन दिले जाते. शहरात उन्हाळी सुट्या असल्यामुळे भाविकांची संख्या दररोज लाखोंच्या पटीत असल्याने सचिन रोचकरी यांनी प्रभाग क्र. 8 मध्ये भाविक हे जास्त प्रमाणात येत असतात. त्यामुळे या भागात मोफत पाणी पुरवठा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच दिपक चौक येथे स्वखर्चातुन भाविक,नागरिकांसाठी थंड जार पाणपोई शुभारंभ करण्यात आला. 


 
Top