तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदिरातील श्रीकल्लोळ तिर्थकुंड जवळ भाविक व सुरक्षा रक्षकात शाब्दीक चकमक घटना रविवार दि. 5 मे रोजी घडली.

या बाबतीत अधिक माहिती अशी की, सध्या  उन्हाळा सुट्या, तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदिरातील श्रीकल्लोळ तिर्थकुंडात भाविकांची हातपाय धुणे, स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवार एक आजी श्रीकल्लोळ तिर्थकुंडात बाहेर यायच्या बाजुने श्रीकल्लोळ जात असताना खाजगी सुरक्षा रक्षकाने आजी आत जावू नका येथेच थांबा. पाण्यामुळे पायऱ्या निसरड्या झाल्या आहेत व पाय घसरुन पडचाल. यामुळे आमच्या वर बालंट येईल असे सांगत असताना आजी तशाच उलट मार्गाने आत जाताना आजीचे नातेवाईक व खाजगी सुरक्षा रक्षकात शाब्दीक चकमक होवुन बाचाबाची  सुरु होवुन हाणामारी पर्यत जाण्याच्या मार्गावर असताना बाजुचा सुरक्षा रक्षकांनी दोघांना आवरल्याने पुढील संभाव्य घटना टळली. श्रीतुळजाभवानी मंदिरात येणारा भाविक गुन्हेगार नसतो. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी भाविकांशी सौजन्याने वागणूक देण्याचे आदेश मंदीर संस्थानने द्यावेत, अशी मागणी होत आहे.


 
Top