धाराशिव (प्रतिनिधी)- पाच वर्षे ज्यांना खासदार केले, त्यांनी संसदेत जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी काहीही केलेले नाही. खोटे बोलून, दुसऱ्यांवर टीकाटिप्पणी करून विकास होत नसतो. त्यामुळे आता मतदारांनी थोडा विचार करून मतदान करावे. आपल्या जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून ओळख पुसण्यासाठी महायुतीच सक्षम आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडून देत मोदींचे हात बळकट करावेत, असे आवाहन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील जवळा नि. येथे पालकमंत्री तथा शिवसेना नेते प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी प्रचारसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जवळा नि. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना पालमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माजी अध्यक्षा तथा लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी खेडोपाड्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. 


 
Top