तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाई पार्श्वभूमीवर जनसेवा हिच ईश्वर सेवा मानून शहरातील जिजामाता नगर मध्ये सामाजिक कार्यकर्ते बालाजी तट, राहुल कदम यांच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

या मोफत पाणीपुरवठा शुभारंभ दिनेश कापसे, बालाजी तट, राहुल परमेश्वर यांच्या  शुभ हस्ते करण्यात आला. सध्या जिजामाता नगरमध्ये दिनेश कापसे व बालाजी तट यांच्या वतीने सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला  जात आहे.

तुळजापूर शहरात  भीषण  पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गोरगरीबांना पाणी विकत घेऊन  वापरणे अशक्य असल्याने या भागातील  नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागु नये  म्हणून हा उपक्रम शुभारंम केला आहे. हा उपक्रम राबवत असल्या बद्दल  जिजामाता नगर रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कापसे, राहुल परमेश्वर, बालाजी तट, प्रशांत  जमदाडे, रोहीत  बाळासाहेब  पलंगे यांचे आभार मानत आहे.

 
Top