तुळजापूर (प्रतिनिधी)- अनाधिकाळापासून आलेल्या रूढीपरंपरेनुसार श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन चरणतिर्थाच्या वेळेस गाभाऱ्यातून सगळया भाविक भक्तांना 

पूर्वरत सुरू करावे.  अन्यथा  विश्वस्थांवर कोर्टाच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल. असा इशारा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन किशोर गंगणे माजी अध्यक्ष, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ, अँड शिरीष कुलकर्णी माजी अध्यक्ष तुळजापूर विधीज्ञ संघ, तुळजापूर यांनी दिला आहे.

श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. पूर्वीपासून देवीच्या व मंदिराच्या रूढीपरंपरेप्रमाणे व चालीरितीप्रमाणे व पूर्वीपासून चालत आलेल्या रितीरिवाजाने श्री तुळजाभवानी देवीचे पहाटच्या चरणतिर्थ वेळी सर्व आलेल्या देवी भक्तांना गाभाऱ्यात दर्शन घेण्याची रूढीपरंपरा आहे आणि त्यामुळे भाविक भक्तांना एक प्रकारचे समाधान मिळते. चरणतिर्थाच्या वेळेस पूर्वीप्रमाणे गाभाऱ्यातून देवीचे दर्शन सध्या दिले जात नाही. श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे मुख्य उद्देश भाविक भक्तांना देवीचे दर्शनाची व्यवस्था करणे हे आहे.

यापूर्वीही विश्वस्थांनी मंदिराच्या प्राचीन रूढीपरंपरेविरूध्द व भाविकांवर अन्याय करणारा ठराव दिनांक 18/08/2013 रोजी घेवून भाविकांचे गाभान्यातून दर्शन चरणतिर्थ पूजेवेळचे बंद केलेले होते. परंतू आम्ही आपल्या अन्यायकारक ठरावाविरूध्द व भाविकांचे चरणतिर्थाच्या वेळसचे गाभाऱ्यातून दर्शन बंद केल्यामुळे आम्ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव येथे दाद मागितली होती. त्यामध्ये कोर्टाने प्रकरण क्रमांक चौकशी क्रमांक 898/2017 मध्ये दिनांक 18/5/2018 रोजी निर्णय व आदेश देऊन अध्यक्ष व विश्वस्थांना सुचीत केले. सदर आदेशात स्पष्ट केले की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सर्व विश्वस्थांना आदेशीत करण्यात येते की, सर्व भाविक भक्तांना देवीच्या चरणतिर्थ पूजेच्या वेळेस दर्शन उपलब्ध करून दयावे. असे स्पष्ट आदेश सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव यांनी अध्यक्ष व सर्व विश्वस्थांना दिलेले असताना सुध्दा कोणतेही बेकायदेशीर निर्णय घेवून व कोर्टाचे आदेश असतानाही त्याविरूध्द ठराव घेवून निर्णय घेऊन कोर्टाच्या आदेशाचे पालन सर्वच विश्वस्थांनी केलेले नाही. कोर्टाच्या आदेशची पायमल्ली केलेली आहे. 

 
Top