धाराशिव (प्रतिनिधी)-फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक आता त्याच किरकोळ लोकांकडे मताची झोळी पसरताना दिसत आहे. ते किरकोळ आहेत,तर मग आता मतासाठी का त्यांच्या पाया पडत आहात असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांना केला आहे. काटगाव (ता.तुळजापुर) येथे आयोजीत सभेत ओमराजे बोलत होते.

ओमराजे म्हणाले की, सर्वसामान्य लोकांचे सामान्य कामे माझ्याकडुन झाली. हे पाहुन कामे किरकोळ व माणसही किरकोळ असे समजणारी विरोधकाची टोळी आता त्याच सामान्य माणसाच्या मतासाठी मताचा जोगवा मागताना गावोगावी दिसत आहेत. ज्या सामान्य लोकांच्या तुम्ही किरकोळ म्हणुन अपमान केला ती जनता तुम्हाला प्रतिसाद देत नसल्याने तुमच्या पायाखालची वाळु सरकली आहे. फक्त निवडणुकीपुरता विकास करु म्हणणाऱ्या विरोधकांचा खरा चेहरा आता लोकासमोर आलेला आहे. ओमराजे खासदार म्हणुन तुमच्या पाच वर्ष संपर्कात राहिला आहे. फक्त निवडणुकीपुरता मी तुमच्यासमोर आलो असतो तर मला मत मागायचा सुध्दा अधिकार राहिला नसता. हक्काने मी तुम्हाला मतदान मागत आहेत. गावागावातुन लोकांना मताची तर हमी दिलीच आहे पण सोबत पैसा देऊन त्यानी मला प्रेम दिले आहे. स्वकष्टाने कमवुन दिलेला हा पैसा खोका पेटीच्या किंमतीपेक्षा कित्येक पट्टीने अधिक असल्याचे ओमराजे म्हणाले.


 
Top