धाराशिव (प्रतिनिधी) - संदेश भाउसाहेब पाटील, वय 23 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांचा दि. 24.05.2024 रोजी करजखेडा येथे त्यांचे राहते घरासमोर ओठ्यावर रात्री झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने  डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेने कसून तपास केल्यानंतर दोनच दिवसात खून प्रकरणातील संदेशचा भाऊ व त्याचे वडील यांना गजाआड केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदेश भाउसाहेब पाटील हा घरात नेहमी वडील व भावा सोबत जमीणीचे वाटणीचे कारणावरुन व नवीन चारचाकी कार खरेदीचे कारणावरुन भांडण तक्रारी शिवीगाळ करत होता. त्याचे नेहमीच्या या कारणामुळे वडील व भाउ वैतागले होते. त्याचाच राग मनात धरुन वडील भाउसाहेब गोविंदराव पाटील व भाउ प्रितम भाउसाहेब पाटील या दोघांनी संगणमत करुन दि. 24 मे 2024 रोजीचे मध्यरात्रीचे सुमारास मयत संदेश भाउसाहेब पाटील हा राहते घरासमोरील ओट्यावर झोपला असताना त्यास झोपेतच डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले आहे. अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळल्यावरुन पथकाने  दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले. 

जिला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ अमोल निंबाळकर, विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोहा शैला टेळे, चालक संतोष लाटे, घुगे, किवंडे यांच्या पथकाने केली ही कारवाई केली.


 
Top