तुळजापूर (प्रतिनिधी) - देवदर्शन करून वापस जात असलेल्या भाविकांच्या गाडीला काळाने घाव घातला असल्याची घटना दिनांक 21 मे रोजी घडली असून  या अपघातामध्ये  सात जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 तुळजापूर अक्कलकोट रोडवर तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे कंचेश्वर साखर कारखाना जवळ सदर अपघात घडला आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ येथील दर्शन करून भाड्याने टमटम करून श्री आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी भाविक हे आली होती. आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन टमटमने अक्कलकोटकडे जात असताना कंचेश्वर साखर कारखाना येथे दुपारी 02 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला आहे. अक्कलकोट वरून दर्शन करून तुळजापूरकडे येणारे क्लोजर गाडीची व टमटमची समोरासमोर जोराची धडक होऊन टमटम मधील जखमी  सुनिता संजय शिंदे वय 50 वर्ष रा रत्नागिरी  चिपळूण, गीता विष्णुकांत कदम वय 65 वर्ष रा. चिपळूण रत्नागिरी, शीला सुरेश भोसले वय 62 वर्ष रा .कल्याण, गौरी संतोष शिंदे वय 24 वर्ष रा. शिरगाव चिपळूण जिल्हा रत्नागिरी, निकिता सचिन शिंदे वय 45 वर्ष रा .शिरगाव चिपळूण जिल्हा रत्नागिरी, टमटम चालक  हनुमंत दशरथ भिंगले वय 36 वर्ष रा .अक्कलकोट ही जखमी झाले आहेत. तर क्लोजर मधील कोमल तुषार शिरसागर वय 24 वर्ष रा. संभाजीनगर हे पण या अपघातात जखमी झाले आहे.

जखमीला ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते लिंगप्पा स्वामी यांच्या खाजगी गाडीतून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टर यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आले आहे. तर त्यामधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. सदर टमटमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तर गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

 
Top