तुळजापूर (प्रतिनिधी) -श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात राञी  चौकात वाहनतळांमध्ये  बोगस पुजारी आपण खरे पुजारी आहोत असे सांगुन भाविकांची फसवणूक करीत असल्याने चौकाचौकांमध्ये व वाहनतळात रात्री फिरणाऱ्या बनावट पुजाऱ्यांवर फिरण्यास बंदी घालण्याची मागणी पोलिस अधीक्षक यांना निवेदन देवुन श्रीतुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाने केली आहे.

पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या नगरीत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी

व धार्मिक विधी करण्यासाठी राञी अपराञी  येतात. भक्तांचे धार्मिक विधी करण्याचे अधिकार हे ठराविक पुजारी बांधवांना आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात बोगस पुजारी हे भक्तांची फसवणुक करीत आहेत. त्यामुळे मंदिर संस्थानची पुजारी बांधवांची नाहक बदनामी होत आहे. रात्री 10:00 नंतर अनेक चौकात हे बोगस पुजारी उभे राहुन भक्तांची फसवणुक करतात. तरी 11:00 नंतर चौकाचौकात, गल्ली, भवानी रोड, शिवाजी चौक, जुने बसस्थानक, कमानवेस, शुक्रवार पेठ, आर्य चौक येथे उभे राहातात. त्यांना रात्री 11:00 नंतर बोगस पुजाऱ्यांना रस्त्यावर फिरण्यास बंदी घालावी. ङी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी ओळखपत्र असणाऱ्या पुजाऱ्यांना त्यामध्ये सवलत देण्यात यावी अशी मागणी पोलिस अधीक्षक यांना निवेदन देवुन श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळ यांनी केले आहे. 

 
Top