तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामीण  भागातील काक्रंबा येथील कोमल साठे  (वय 35) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. बुधवार त्यांचा तिसरा दिवस होता. त्यांचे पती महादेव साठे व साठे परिवाराने नदीत रक्षा विसर्जित न करता वृक्षारोपण करत रक्षाविसर्जन केले. 

या बद्दल खासकरुन मराठा समाज बांधवातुन शेतकरी परिवार असलेल्या परिवाराने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याच्या सांगितले जात आहे. शेतकरी  मराठा परिवार समाजातील परिवाराने अंधश्रध्देला फाटा दिला. 

 
Top