धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील ज्युदो खेळाडूंसाठी जिल्हा नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व संघटनेचे अध्यक्ष श्री. नितीन काळे यांच्या विशेष प्रयत्नातून ज्युदोमॅट उपलब्ध करून देण्यात आले. या ज्युदो मॅटचे पूजन भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष श्री. नितीन काळे यांच्या हस्ते पूजन करून मॅट खेळाडूंना सरावासाठी सुपूर्द करण्यात आल्या.

धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिलेली आहे, आहे त्या सुविधेवर मैदानी गाजवणारे खेळाडूंसाठी आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव झळकावू शकतात याच दृष्टीने या खेळाडूंसाठी मॅटमुळे अधिक सराव करणे हे सोयीचे होईल, असे मत यावेळी ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष  नितीन काळे यांनी व्यक्त केले. यावेळी सहा जून रोजी चीन येथे होणाऱ्या मॉडर्न पेन्टॅथलॉन लेझर रन या क्रीडास्पर्धेसाठी कु. योगिनी उमाकांत साळुंके हिची निवड झाल्याने तिचा सत्कार श्री. नितीन काळे यांच्या हस्ते करून तिला भविष्यातील स्पर्धेसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा ज्यूदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, क्रीडा भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण खडके, जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, जिल्हा मॉडर्न पेन्टॅथलॉन संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर भुतेकर, उद्योजक गोविंद मराठे आदींसह जुदोपटू व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top