धाराशिव (प्रतिनिधी) - येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये निकालाची उज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. कनिष्ठ विभागातील विज्ञान विभागाचा निकाल  98.15% वाणिज्य विभाग 94.96% कला विभाग 86.66% इलेक्ट्रॉनिक्स अँड फायनान्शियल ऑफिस मॅनेजमेंट 78.94% इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी 90.90% इतका निकाल लागला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील निकालाची उज्वल परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवली आहे याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे.

विज्ञान विभागातील कु.सिद्दिकी  सोयबारवान तौफिक या विद्यार्थिनीने 90.50% गुण घेऊन  महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. महाजन हर्ष प्रशांतराव याने 85.33% तर शिरसाट सागर भीमसेन आणि कु.पवार सिद्धीका मधुकर हिने 85.17% गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. वाणिज्य विभागातील जगताप सुजल संतोष या विद्यार्थ्याने 90.33% गुण मिळवत प्रथम क्रमांक तर इंगळे अभिषेक शिवशंकर या विद्यार्थ्यांने  89.50%,  व जाधव वैभवी दादाराव या विद्यार्थिनीने 88.50% गुण मिळवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.

कला शाखेतील कु.विधाते करुणा अजय या विद्यार्थिनीने 78.83% , कु.वाघमोडे दुर्गा युवराज या विद्यार्थिनीने 77.17% तर कु. मेंडके अल्फीया रजा या विद्यार्थिनींनी 76 टक्के गुण मिळवून अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभागामध्ये गवळी सुशील ओमप्रकाश या विद्यार्थ्याने 70.33% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर इंगोले सुमित गोवर्धन 65.50% पाटील आदिती विजय 64.83% गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. 

अकाउंटिंग अँड फायनान्शिअल ऑफिस मॅनेजमेंट या विषयात जगदाळे आलेख विकास या विद्यार्थ्याने 69.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक तर सांजेकर मानव विकास या विद्यार्थ्याने 68.33% व राठोड ऋषिकेश राजेश या विद्यार्थ्याने 67.67% गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व गुरुदेव कार्यकर्त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top