तुळजापूर (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात मंगळवार दि. 7 मे रोजी झालेल्या मतदानात  सर्वाधीक मतदान झालेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मतदानाचा वाढता टक्का कुणाच्या पथावर पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघ हा सर्वोधिक चर्चचा स्फोटक बनला आहे. या मतदार संघातील मताधिक्य हे जिल्हयातील आगामी राजकारण्यांचे भवितव्य ठरविणार असल्याने या मतदार संघाच्या मतमोजणीकडे जिल्हयाचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा मतदार संघाचे नाव उस्मानाबाद मात्र चर्चा तुळजापूर विधानसभा मतदार संघाची होत आहे.

धाराशिव लोकसभासाठी सकाळी 7 ते दुपारी 6 या वेळेत 65.40 % मतदान झाले असल्याची अंतीम आकडेवारी समोर आली आहे. 19 लाख 92 हजार 737 मतदार पैकी 12 लाख 72 हजार 754 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 6 लाख 90 हजार 380 पुरुष मतदार व 5 लाख 82 हजार 354 व 20 तृतीयपंथी मतदार यांनी मतदान केले. पुरुष मतदार टक्केवारी 65.53 तर महिला मतदार टक्केवारी 61.91 इतकी राहिली. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 2 लाख 47 हजार 627 मतदान झाले ते  65.40 %, झाले. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 75 हजार 562 मतदाना पैकी 2 लाख 45 हजार 627  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष 198517 पैकी 134001, स्ञी 177039 पैकी 111625 मतदान झाले असुन इतर सहा पैकी  एका मतदाराने मतदान केले. असुन एकुण 65.40टक्के मतदान झाले आहे.

या मतदार संघात निवडणुक कालावधी दरम्यान मोठ्या राजकिय घडामोडी घडल्या. त्यात काँग्रेसचे जेष्ट नेते माजीमंत्री मधुकर चव्हाण यांचे पुञ श्रीतुळजाभवानी साखर कारखाना चेअरमन सुनिल चव्हाण भाजप प्रवेश व देवराज मिञमंडळ संस्थापक अध्यक्ष तथा भाजप माजी जिल्हाउपाध्यक्ष तथा देवानंद रोचकरीचा अर्चनाताई पाटील यांना जाहीर पाठींबा या दोन घटना तालुक्याच्या राजकारणावर मोठ्या प्रभाव टाकणा-या घटना घडल्या. यामुळे तालुक्यात विरोधी पक्षाची राजकिय वजन संपवल्याची चर्चा होत होती. या तुळजापूर विधानसभा मतदार संघात शेकडो कोटी रुपये निधी विकास कामासाठी जाहीर करण्यात आला आहे.


 
Top