धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामता अर्बन व मल्टीस्टेटच्या धाराशिव येथील प्रधान कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यामाता होळकर या मराठेशाहीतील एक दैदीप्यमान नंदादीप होत्या असे प्रतिपादन रूपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष अँड. व्यंकटराव गुंड यांनी केले.

सर्वप्रथम रूपमाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड व सामाजिक कार्यकर्ते व्यंकट मरगने यांच्या हस्ते राज्यमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण व समाज कल्याणासाठी कार्य केले. राज्याचा कारभार हातात घेत शासक होत शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्हीचा सन्मान केल्याचे यावेळी अँड. गुंड यांनी सांगितले. यावेळी अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, मल्टीस्टेटचे कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, सर व्यवस्थापक विजयकुमार खडके, प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड, शाखा व्यवस्थापक पवनकुमार जमाले सर्व कर्मचारी वृंद व खातेदार उपस्थित होते.

 
Top