तुळजापूर | प्रतिनिधी

कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मंदिरात सशुल्क दर्शन रांग आत व धर्मदर्शन रांग बाहेर असल्याने देवीदर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे मंदिरात धर्मदर्शन रांगेत येणाऱ्या भाविकांसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

धर्मदर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांना दोन ते तीन तास थांबूनही  दर्शन घडण्याऐवजी सशुल्क रांगेतील भाविकांच्या पाठीचे दर्शन घडत आहे. वयोवृध्द महिला व लहान मुलांना दर्शन मिळणे कठीण झाले आहे. धर्म दर्शन रांगेतील भाविकांसाठी सिंहगाभाऱ्यात लाकडी रँम्प करावा किंवा चोपदार दरवाजाच्या भागात बसवलेली फरशी काढून अर्धा फुट खोल करावा, जेणेकरुन धर्मदर्शन रांगेतील भाविकांना देखील दर्शन घडेल. सध्या सशुल्क दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांनाच दर्शन  घडत असून धर्मदर्शन रांगेतील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी भाविकांना देवीदर्शन घडत नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांनी याकडे लक्ष देऊन धर्मदर्शन रांगेतील भाविकांना सुलभ दर्शन घडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 
Top