तुळजापूर | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी  तुळजापूर येथे कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी  मातेचे दर्शन  घेतले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे, विकास मलबा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जालना लोकसभा मतदार संघात यंदा अत्यंत चुरशीची लढत झाली. त्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या देवी दर्शनाबाबत  राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दानवे यांनी देवीला विजयी भवः असा आशीर्वाद तर मागितला नाही ना? अशी चर्चा होत आहे, लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देवी दर्शनासाठी येणारे दानवे हे पहिलेच उमेदवार आहेत. 

 
Top