धाराशिव  -

घराचे कुलूप तोडून सोने, चांदीच्या 1 लाख 44 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना धाराशिव शहरातील समता नगर येथे घडली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समतानगर येथील 11 नंबर शाळेसमोर राहणारे सुनील चंद्रकांत आंबेकर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 17 ते 18 मे रोजीच्या दरम्यान तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा पंचपाळ, छल्ला, आरत्या, लक्ष्मीची मूर्ती, वाळे, पैंजण असा एकुण 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत सुनील आंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 
Top