भूम (प्रतिनिधी)- शहरापासून तीन कि मी अंतरावर भूम ते नगर रस्त्यावर इंडिका कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला . यामध्ये शहरातील काळे परिवारातील पाच जण जागीच ठार झाल्याने शहरातील पारधी पिढीवर शोककळा पसरलेली आहे. ही घटना सौरभ हॉटेल जवळील वीट भट्टीजवळ मंगळवार दि. 7 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत  अधिक माहिती अशी कि, भूम ते अहमदनगर रोडने भूम येथील पारधी समाजातील कुटुंब  उळूपकडे देवकार्यासाठी दुचाकीवरून चालले होते. ते नगर रोडवरील सौरभ हॉटेल जवळील वीट भट्टी जवळ आले असता समोरून भूम कडे येणाऱ्या टाटा इंडिका क्र. एम एच 25 आर 0879 चा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता कि, या अपघातात मोटार सायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत तीन जण जाग्यावरच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच भूम पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. यावेळी रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला होता. मात्र नेहमी प्रमाणे ती गाडी उपलब्ध होऊ शकली नाही. त्याच वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे पाटसांगवी येथील घटनस्थळास भेट देऊन परतत होते. त्यांनी गर्दी पाहून गाडी थांबविली. गरज ओळखून तात्काळ त्यांनी त्यांच्या शासकीय वाहनात जखमींना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व विजयसिंह थोरात यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना उपचारासाठी आणण्यासाठी मदत केली. रुग्णालयात डॉ. अविनाश भोरे यांनी जखमींना धाराशिव येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. यामध्ये बप्पा खोक्या काळे त्याची पत्नी, तीन मुले व त्याचा सासरा यांना धाराशिव येथे पाठविण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चालू आहे.


 
Top