धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त संस्था अध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या सामाजिक कार्यांची थोडक्यात माहिती देऊन त्यांच्या कार्यांला उजाळा दिला.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , पर्यवेक्षक सुनील कोरडे, धनंजय देशमुख, ज्येष्ठ शिक्षक एच.एस. ठेले, आर. पी. पवार, बी.टी. गवळी, विश्वास शेवाळे, ए. सी. माढे व सेवानिवृत्त महेश देशमुख तसेच ऋषीकेश शिंदे , सेवानिवृत्त तज्ञ शिक्षक शिवकुमार लगाडे  उपस्थित होते.

 
Top