धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून  36 वर्षे 11 महिने सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल  संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष सुधीर पाटील यांनी महेश विठ्ठलराव देशमुख यांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन सत्कारीत केले. तर पुढील आयुष्य त्यांना सुखाचे , समृद्धीचे व आरोग्याचे जावो या शुभेच्छा  संस्थाध्यक्षांनी यावेळी दिल्या.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक सुनील कोरडे, धनंजय देशमुख तसेच ज्येष्ठ शिक्षक एच. एस. ठेले, आर. पी. पवार,  बी. टी. गवळी, विश्वास शेवाळे, ऋषीकेश शिंदे तसेच तज्ञ सेवानिवृत्त शिक्षक शिवकुमार लगाडे उपस्थित होते.

 
Top