धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी 2139 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.यापैकी 1071 मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मतदान केंद्रावर कोणताही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेऊन वेब कॅमेरे लावण्यात आले आहे.या सर्व 1071 वेब कॅमेरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कक्षात लावण्यात आलेल्या 25 टीव्हीच्या माध्यमातून आणि उमरगा,तुळजापूर,उस्मानाबाद आणि परंडा येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त लावण्यात आलेल्या प्रत्येकी 10 टीव्हीच्या माध्यमातून लक्ष राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर आठ आणि विधानसभा मुख्यालयावर तीन तांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा मतदार संघातील 50 टक्के मतदान केंद्राचे नागरी उपयोजनांचा एक भाग म्हणून या 1071 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.या केंद्रावर लावण्यात आलेल्या वेब कॅमेरामुळे मतदान अधिकाऱ्याने मतदाराची ओळख पटविण्याची प्रक्रिया,मतदाराच्या बोटाला शाई लावणे,मतदाराची समाधानकारक ओळख पटवून झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाद्वारे ईव्हीएमचे नियंत्रण युनिट सुरू करणे, ईव्हीएमच्या मतदान युनिटवर लक्ष देण्यासाठी मतदान कक्षात जाणे,मतदान समाप्तीच्या वेळी मतदान केंद्रासमोरील रांगेतील आणि परिसरातील मतदारांना चिठ्ठ्या/ टोकणचे वाटप करणे,ईव्हीएम मोहर बंद करून मतदान प्रतिनिधींना नमुना 17- सी च्या प्रती देणे याबाबीवर लावण्यात आलेल्या वेब कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.


 
Top