धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील मिलिंद नगर येथील महिलांनी भाजपात तर व जय भीम प्रतिष्ठानच्या कायर्र्कर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील व उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जयमालाताई सावंत, शिलाताई साबळे, कुसुमताई रणदिवे, मंगलताई पडवळ, प्रियांकाताई वाघमारे यांच्यासह अनेक माता-भगिनींचा यात समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या सर्व महिलांनी यावेळी बोलून दाखविले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशासाठी अतुल आदमाने यांनी पुढाकार घेतला होता. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जय भीम प्रतिष्ठानचे गोपीशेठ बनसोडे, आकाश बनसोडे, विवेक जाधव, रोहित बनसोडे, राहुल गंगावणे, आकाश साबळे यांच्या सह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपापल्या गावातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले.


 
Top