तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात श्री संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.                     

यावेळी हभप दत्तात्रय महाराज अंबीरकर यांचे गुलालाचे किर्तन झाले. यावेळी मंदिर प्रशासक रूपाली कोरे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थितीत होते. पुण्यतिथिनिमीत्ताने मानाचे फडकऱ्यांचे अभिषेक संपन्न झाले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


 
Top