भूम - तालुक्यातील पखरुड येथे माजी सैनिकांचा सेवानिवृत्ती सोहळा बुधवार दिनांक 08 रोजी  येथील मारुती मंदिराच्या मैदानात  पार पडला. पखरूड गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 


माजी सैनिकांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याआधी गावातील आजी-माजी सैनिक, सेवानिवृत्त सर्व सैनिक तसेच सैन्यामध्ये नव्याने भरती झालेल्या पखरूड गावातील सैनिकांच्या पालकांची गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बेलेश्वर रोडवरील येथील शहीद जवान श्रीराम पांडुरंग चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्प अर्पण करण्यात आले. मारुती मंदिराच्या मैदानात सेवानिवृत्त सुभेदार महारुद्र बापूसाहेब चव्हाण, सुभेदार भरत नारायण चव्हाण, बीएचएम पांडुरंग चव्हाण, हवालदार विष्णू रामहरी नाईक, हवालदार गोकुळ नवनाथ चव्हाण या सेवानिवृत्त सैनिकांचा व गावातील माजी सैनिकांचा गावातील आजी-माजी सैनिकांनी आयोजित केलेल्या सेवानिवृत्ती सोहळ्यात सत्कार करण्यात आला. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झेडपीचे माजी सभापती व वेटरन्स इंडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष हेमंतराव देशमुख, उपाध्यक्ष प्रभाकरराव हाके, गावचे माजी सरपंच काकासाहेब चव्हाण, सरपंच कांबळे, उपसरपंच विष्णू चव्हाण, माजी उपसरपंच दादासाहेब चव्हाण,,माजी सैनिक दिलीप भोसले, सोनू चव्हान, सैनिक श्रीराम कांबळे , श्री. गोसावी, माजी सैनिक श्रीकांत चव्हाण यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पखरुड गावचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या सोळाशे मतदान व तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये दीडशेपेक्षा जास्त आजी-माजी सैनिक आहेत.

 
Top