परंडा (प्रतिनिधी) - दि.21 मे 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयाचा निकाल 86.99 टक्के लागला असून महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम टिकविली आहे. 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता बारावी कला वाणिज्य विज्ञान विभागाचा निकाल नुकताच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.विज्ञान विभागाचा निकाल 97.15 टक्के कला विभागाचा निकाल 71.42 तर वाणिज्य विभागाचा निकाल 90.60% असा लागला असून एकूण महाविद्यालयाचा निकाल 86.99% एवढा आहे.

विज्ञान विभागातुन कु.अक्षदा रामराजा खराडे या विद्यार्थिनीने 84.50% गुण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.कु शिवानी चंद्रकांत कदम या विद्यार्थिनीने 83.67% गुण घेऊन दुसरा क्रमांक तर कु आलिया मुखीद मुजावर या विद्यार्थिनीने 81.33% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.कला विभागातून कु. पूजा सतीश खरात या विद्यार्थिनीने 82.33 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला कु.तेजश्री प्रमोद पाटोळे या विद्यार्थिनीने 79.83% गुण घेऊन दुसरा क्रमांक तर कु. मनीषा लक्ष्मण जगताप या विद्यार्थिनीने 73.50% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. वाणिज्य विभागातून कु. निकिता सुभाष ठोसर या विद्यार्थिनीने 85.50% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला कु. रामा भास्कर कांबळे या विद्यार्थ्याने 68.67% गुण घेऊन दुसरा क्रमांक तर कु विशाल वसंत हूके या विद्यार्थ्याने 68 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर , अध्यक्ष सुनील शिंदे , प्राचार्य डॉ सुनील जाधव, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख, उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 
Top