धाराशिव : पुणे येथील वेस्टिन हॉटेल कोरेगाव पार्क येथे 8 मे रोजी झालेल्या आठव्या ऑल इंडीया अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकींग सर्वोच्च परिषदेत मराठवाड्यातील सर्वात मोठी अग्रगण्य आणि जुनी बहुराज्यीय बँक म्हणून ओळखल्या जाणार्‍या व महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यात कार्यक्षेत्र असणार्‍या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन, सहकारमहर्षी वसंतराव नागदे यांना  सन 2024 सालचा सहकार व बँकींग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट चेअरमन हा सर्वोच्च पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 

सदरीत शिखर परीषदेस आरबी आयचे संचालक सतीश मराठे, एनयुसीएफडीसीचे चेअरमन ज्योतीद्र मेहता, एनएफसीयुबीचे अध्यक्ष तथा कांगरा को-ऑप बँकेचे चेअरमन लक्ष्मी दास, कॉसमॉस बँकेचे चेअरमन तथा एनएफसीयुबीचे उपाध्यक्ष मिलींद काळे, उत्तर भारत को-ऑप बँक फेडरेशनचे चेअरमन तथा एनएफसीयुबीचे उपाध्यक्ष मुदीत वर्मा, पुणे पिपल्स को-ऑप बँकेचे संचालक तथा पुणे जिल्हा अर्बन को-ऑप बँक असोसिएशनचे चेअरमन सुभाष मोहिते, लक्ष्मीबाई महिला नागरी सहकारी बँकेच्या चेअरमन तथा एनएफसीयुबीच्या संचालक अलका श्रीवास्तव अशा सहकार क्षेत्रातील नामवंत व्यक्तीची उपस्थिती होती. तसेच उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक आशिष मोदाणी, प्रदीप जाधव पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके व आदी मान्यवराची विशेष उपस्थिती होती.

सदरील शिखर परिषदेत परिवर्तनकारी आणि कार्यक्षम बँकांसाठी परवडणारे तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्रात बँकेच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय घोडके यांनी सहभाग नोंदवून आपले विचार मांडले. सदरील शिखर परिषदेस देशभरातील जवळपास 300 बँकेच्या प्रतिनिधीनी सहभाग नोंदविला होता.सदरील पुरस्कार मिळाल्याने बँकेचे विद्यमान संचालक मंडळ, कर्मचारी वृंद सन्मानीय सभासद, ग्राहक व सर्व समाज घटकातील हितचिंतकाकडून वसंतराव नागदे यांचेे अभिनंदन होत आहे.


 
Top