धाराशिव (प्रतिनिधी)- रूपामाता उच्च माध्यमिक विद्यालय पाडोळी (आ) या शाळेची यशाची परंपरा कायम असून, 12 वी परीक्षेचा  शाळेचा  निकाल 95.65 टक्के लागला आहे.

शाळेतून प्रथम- कु. पाटील ऐश्वर्या बाळासाहेब-78.17% द्वितीय क्रमांक- माळी संस्कृती बालाजी -76.17%, तृतीय क्रमांक-माळी साक्षी बंकट -75.67  % या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक  ॲड. व्यंकट विश्वनाथराव गुंड, मार्गदर्शक माजी जि.प. उपाध्यक्ष  सुधाकर गुंड गुरुजी, संस्थेच्या सचिव श्रीमती कौशल्या सुधाकर गुंड,  बाबुराव पुजारी, रुपामाता उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित व्यंकटराव  गुंड, ॲड. शरद गुंड, प्राचार्य मनसूळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरवसे, सर्व ग्रामस्थ, पालक तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.


 
Top