तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या वारी दिवशी  मंगळवारी आलेल्या चैञी पोर्णिमे निमित्त अवकाळी पाऊस ऊन वादळवारा सहन करीत सुमारे लाखभर भाविकांनी देवीदर्शन घेवुन देवीचरणी चैञी पोर्णिमा वारी अर्पण केली. श्रीतुळजाभवानी मातेची वारी अर्पण होताच भाविक थेट येरमाळ्याचा येडाईच्या दर्शनार्थ रवाना होत होते.

चैञी पोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात आकर्षक अशी फुलांची गर्भगृह ते  मंदीर प्रांगणसह  राजेशहाजी महाध्दार पर्यत केली होती. मंगळवार पहाटे एक  वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनार्थ आरंभ झाला. तत्पुर्वी भविकांनी भवानी तिर्थ कुंडात स्नान करुन थेट दर्शनार्थ दर्शन मंडपात दाखल होत होते  पहाटे एक वाजल्या पासुन दर्शन रांगा भाविकांनी भरभरुन वाहिल्या.

सकाळी सहा वाजता देविजीस प्रथमता पाच श्रीखंड सिंहासन महापुजा करण्यात आल्या. नंतर भाविकांचे दही, दुध, पंचामृत अभिषेक करण्यात आले. ते दहा वाजता संपल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर आरती करण्यात येवुन अंगारा काढण्यात आला. आज देविभक्तांनी देविजीस भोगी साडीचोळी, पंचामृत अभिषेक पुजा, नैवध  नवीन माळ, पारडी घेणे, दंडवत, गोंधळ अदि धार्मिक विधी मनोभावे केले. आज धर्म दर्शन, मुख पेड दर्शन, अभिषक रांगा भाविकांनी भरभरुन गेल्या होत्या. देवीदर्शनानंतर भाविकांनी पीठमीठानी पाच परड्या भरुन त्याचे मनोभावे दर्शन घेतले. सांयकाळी देविजीस दही दुधपंचामृत अभिषेक करण्यात आल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालुन आरती करण्यात आली. नंतर चैञी पोर्णिमेचा छबिना मंदिर प्रांगणात काढण्यात आल्या. नंतर महंत वाकोजी बुवा, गुरुतुकोजी बुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर आपल्या उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर चैञी पोर्णिमा धार्मिक विधीचा सांगता झाली.


 
Top