तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेचा मंगळवारी आलेल्या चैञी पोर्णिमा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेतकरी, कष्टकरी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. भवानी तिर्थकुंडात स्नान करुन दर्शन रांगेतुन श्रीतुळजाभवानी दर्शन घेवुन पुजा अर्चा करुन देवीचरणी चैञी पोर्णिमा वारी लाखो भक्तांनी अर्पण केली.

हालहापेष्टा सहन करुन आलेला भाविक देवीदर्शन करताच धन्यधन्य होत होता. चैञी पोर्णिमा निमित्ताने श्रीतुळजाभवानी मंदीरात आकर्षक असा फुलांचा आरास करण्यात आला होता. सोमवार राञी मुसळधार पाऊस झाल्याने पोर्णिमा निमित्ताने आलेल्या भाविकांचे प्रचंड हाल झाले. हे हाल हापेष्टा सहन करीत  मंगळवार पहाटे एक वाजता भवानी तिर्थकुंडात स्नान करुन दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटे पासुन प्रचंड गर्दी केली होती. सुमारे लाखभर भाविकांनी देवीदर्शन घेवुन देवीचरणी चैञी पोर्णिमा वारी अर्पण केली. श्रीतुळजाभवानी मातेची वारी अर्पण होताच भाविक थेट येरमाळ्याचा येडाईच्या दर्शनार्थ रवाना होत होते. सकाळी सहा वाजता देविजीस  भाविकांचे दही, दुधपंचामृत अभिषेक करण्यात आले. ते दहा वाजता संपल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर आरती करण्यात येवुन अंगारा काढण्यात आला. आज भाविक भक्तांनी देविस भोगी पुजा, नैवध, नवीन माळ, पारडी घेणे अदि धार्मिक कार्य केले. राञी मंदिरात चैञी पोर्णिमेचा छबिना मिरवणूक काढण्यात आली. नंतर महंत वाकोजी बुवा, गुरुतुकोजीबुवा यांनी जोगवा मागितल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले.


महाद्वारासमोर दलदल !

श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर दिवसभर चार हजारच्या आसपास श्रीफळ फोडल्याने यातील पाणी रस्त्यावर पडुन येथे निसरडा रस्ता  तयार होवुन येथे अनेक वृध्द भाविक पाय घसरुन पडून जखमी झाले. तसेच येथे श्रीफळ फोडणारे व दर्शन करुन बाहेर जाणाऱ्यांची एकच गर्दी होवुन येथे मार्गक्रमण करताना भाविकांचे हाल झाले.


 
Top