भूम (प्रतिनिधी)-रविंद्र हायस्कूलचा विद्यार्थी राजवीर राजकुमार सुळ याची राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्या स्क्रिनींग टेस्ट (STNMS) मध्ये निवड झाली. या स्क्रिनींग टेस्टमध्ये जिल्ह्यातून फक्त दोन विद्यार्थ्यांची निवड झाली व तालुक्यातून एकमेव राजवीर सुळ याची निवड झाली. त्याबद्दल राजवीर सूळचा व त्याच्या पालकांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जी.डी.सुळ, संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती. शर्मिला पाटील,पर्यवेक्षक  मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, रविंद्र प्राथमिक चे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top