धाराशिव (प्रतिनिधी)-40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व  आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी धाराशिव तालुक्यातील अनसुर्डा येथील युवकांनी आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थिती प्रवेश केला.

याप्रसंगी प्रवीण माने, बालाजी माने, रितेश माने, रफिक शेख, सुरज माने, विशाल माने, शिवप्रसाद माने, ज्ञानेश्वर माने, अजिंक्य माने, नामदेव माने, अभिजीत माने, अमोल दुबे आदी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पांडुरंग माने, युवा सेना विधानसभा प्रमुख सुरज पवार, ज्ञानेश्वर नामदेव माने, आण्णा बोंदर, आदित्य बोंदर, जगन्नाथ डोके आदीसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top