तुळजापूर  (प्रतिनिधी)- तालुक्याचा कारभार जेथुन पाहिला जातो असे तहसिल कार्यालयातील तेथील बसवलेले सीसीटीव्हि मागील चार ते पाच  महिन्यापासुन बंद असल्याने या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

तहसिल कार्यालयात तहसिल कार्यालय, उपकोषागार कार्यालय, रजिष्ट्रि कार्यालये आहेत. येथे कामासाठी दररोज चार ते पाच हजार मंडळी येतात. या भागात मागील पंधरा दिवसात शेती खरेदी विक्रीसाठी आलेल्या मंडळीमध्ये तुफान हानामारी झाली. पण सीसीटीव्हि नसल्याने ती हाणामारी कैद होवू शकली नाही. मोटार सायकल चोरीला गेली पुरावा नाही. मुख्य शासकीय कार्यालय  त्यामुळे  तहसिल कार्यालयात सी सी टी व्हि असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत. विशेष म्हणजे तहसिल कार्यालयात अव्वल कारकून म्हणून नौकरी करीत असलेले नवनाथ भागवत येलगूडे वय 36 वर्ष यांची मोटार सायकल एम.एच.13 सी.ई. 6583 होन्डा शाहीन कंपनीची गाडी  दि.27/03/2024 रोजी अज्ञात चोरट्याने चोरी केली. 28 हजार रुपये किंमतीची  मोटार सायकली चोरटयांनी पळविली असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तहसिल कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही बऱ्याच दिवसा पासून बंद पडलेली आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे टुव्हिलर चोरी करून जाताना सीसीटीव्हि कैद झाला असता. मात्र बद सीसीटीव्हि चोराला मेसाई दार्जिन अशी परिस्थिती झाली आहे.

तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे दिवसेंदिवस मोटर सायकली चोरीचे प्रमाण वाढत असल्याने मोटर सायकलस्वार या घटनेमुळे धास्तावले आहेत. 



 
Top