कळंब (प्रतिनिधी)- मानवाला परमेश्वराने इंद्रिय दिले आहेत या इंद्रियाला मर्यादेत ठेवलं तर भगवंताचा प्रसाद मिळेल असे विचार प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञान सिंधू ह.भ .प. संदीपान महाराज शिंदे हसेगांवकर यांनी दक्षिणमुखी हनुमान मंदिर कसबा पेठ कळंब येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे किर्तन सेवा करीत असताना व्यक्त केले. 

हनुमान जन्मोत्सवानिमित्त दिनांक 16 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कीर्तनसेवे साठी ह. भ .प . ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगांवकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग  परिमळाची धाव भ्रमर वोढी !  तैसी तुझी गोडी लागे मज !! या अभंगावर निरोपण करीत असताना भुंग्याला परिमळाची ओढ असते  त्याप्रमाणे हे पांडुरंगा मला तुझी ओढ लागो, भ्रमर परिमळाला आकर्षित करून घेतो तद्वत आपण आपल्या ईश्वर भक्तीने भगवंताला आपल्याकडे आकर्षित करून घेतली पाहिजे. या अभंगावर निरूपण केले. वैराग्य, ब्रह्म ,प्रेमाच्या प्राप्तीसाठी भगवंत भक्तीची गरज आहे आपण आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे. सहनशीलता आपल्यात असली पाहिजे. आपल्यात अहंकार येऊ देऊ नका जगातला भ्रष्टाचार,अनाचार संपला पाहिजे तरुण पिढी संस्कारित झाली पाहिजे. प्रेमाचे दोन प्रकार असून अनुकूल, विरोधी प्रेम, भगवान श्रीकृष्णाला हे दोन्ही प्रेम गोकुळात मिळाले याप्रसंगी त्यांनी गावरान गाईचे महत्त्व सांगत असताना गाय गोमाता आहे. तिच्या दर्शनात शक्ती आहे. गाय ऑक्सिजन घेते व ऑक्सिजन सोडते दूध,शेण तसेच गोमुत्रामुळे कॅन्सर सारखा दुर्धर आजार बरा होतो. आपल्या दारात एक तरी गाय असावी त्यांनी याप्रसंगी संत श्रेष्ठ गोरोबाकाका संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त तेर येथे वैद्य महावारी 3 मे पासून सुरू आहे यानिमित्त प्रवचन कीर्तन तसेच एक दिवसाचे संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले. दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 6.15 वाजता हनुमान जन्मोत्सव उत्साहात  संपन्न झाला. 

यानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोशनाई तसेच मंदिर विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले होते. भावीक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दक्षिणमुखी हनुमान मंदिर जन्मोत्सव मंडळ कसबा पेठ कळंब यांच्या वतीने सप्ताहासाठी उपस्थित भजन गायक मृदंग वादक यांचा चत्रभुज आप्पा चोंदे,मुरलीधर काका चोंदे, आबासाहेब शिंदे गुरुजी यांनी सत्कार केला माजी नगराध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे यांनी महाप्रसाद पंगत दिली.

 

 
Top