धाराशिव (प्रतिनिधी)-मराठ्यांचे क्रांतीसुर्य, अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.16) धाराशिव-औसा मार्गावरील टेंभी येथील जावळे पाटील यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यात धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुखपदी राजाभाऊ साळुंके तर तुळजापूर तालुकाध्यक्षपदी रवींद्र साळुंके यांची निवड करण्यात आली.  याप्रसंगी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, जालना जिल्हाध्यक्ष राधेश्याम पवळ, नांदेड जिल्हाध्यक्ष दशरथराव कपाटे,  धाराशिव जिल्हा संघटक अमोल गोरे, पुणे संपर्कप्रमुख बिट्टू पांचाळ, पुणे जिल्हा संघटक शरद कुंभार, विद्यार्थी आघाडीचे धाराशिव तालुकाध्यक्ष विक्रम जाधव पाटील, वाहतूक आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवहरी भोसले, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब गुंड व इतर धाराशिव जिल्ह्यातील तसेच  महाराष्ट्रातील छावे उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात राजाभाऊ साळुंके जिल्हाध्यक्षपदी असताना संघटना वाढविण्याचे काम केल्याबद्दल त्यांची संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी धाराशिव, लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top