धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंगघाट अभयारण्यातील नियतक्षेत्र येडशी (उत्तर) कंपार्टमेंट नंतर 193 अंतर्गत रामलिंग मंदिर परिसरातील माकडांचा एक समूह 1 एप्रिल रोजी आजारी पडल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने तात्काळ पशुधन विकास अधिकारी, येडशी यांना प्राचारण करून उपचार करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त धाराशिव यांनी घटनेच्या दिवशीच भेट देऊन त्यांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून उपचारासंदर्भात उपाययोजना सुचविल्या.सूचनाप्रमाणे वनपरिक्षेत्र येडशी (वन्यजीव) येथील कर्मचाऱ्यांनी सर्व उपयोजना तात्काळ केल्या.

1 एप्रिल रोजी मादी माकडाचा मृत्यू झाला असता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन,धाराशिव यांनी शवविच्छेदन करून मृत पावलेल्या माकडाचा व्हिसेरा सीलबंद करून  तपासणीकरिता वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केला.अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

2 एप्रिल रोजी दोन मादी व एक नर, 4 एप्रिल रोजी एक मादी व एक नर आणि सात एप्रिल रोजी एक मादी एक नर व एक पिल्लू असे एकूण नऊ माकडे आजपर्यंत दगावली. पशुवैद्यकीय अधिकारी तसेच विभागीय वनाधिकारी वन्यजीव छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचनाप्रमाणे पुढील उपाययोजना माकडांचा वावर असलेल्या भागांमध्ये करण्यात आल्या आहेत.


 
Top