धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष भोर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी गिरीष यादव,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय श्री.पाटील,जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक श्री.कुलकर्णी व अव्वल कारकून कल्पना काशीद आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थितांनी देखील महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प वाहिली.