धाराशिव (प्रतिनिधी) -काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे यांच्यासह माजी नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दर्शन कोळगे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपात प्रवेश केला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बार्शी येथे प्रचारसभा पार पडली. या कार्यक्रमात धाराशिव येथील माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर तावडे, कुलस्वामिनी शुगरचे चेअरमन आकाश तावडे, माजी नगरसेवक तथा माजी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. दर्शन कोळगे, पळसपचे विभागप्रमुख राजेंद्र तुपे यांनी रविवारी भाजपात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी उमेदवार अर्चनाताई पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार राजाभाऊ राऊत, मल्हार पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top