धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा अंतर्गत महायुती मित्र पक्षातील युवा नेत्रत्व आणि कार्यकर्त्याचा मेळावा अत्यंत उत्साहात धाराशिव नगरीत संपन्न झाला. उद्याच्या भविष्यासाठी आजचा युवा सज्ज झाला असुन 2047 पर्यत विकसीत भारताचा संकल्प पुर्ण करण्यासाठी निर्धाराने मोठ्या संखेने पुढाकर घेत आहे. उस्मानाबाद लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी तसेच पंतप्रधान श्री नरंद्रजी मोदी यांच्या 400 सो पार हा नारा पुर्ण होणार हा विश्वास युवकाच्या उस्फुर्त प्रदिसादामुळे अधोरेखित झाला आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उद्याचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी सकारात्मक कार्यासाठी, देश हिताच्या धोरणासाठी नरेंद्र मोदी जी यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी धाराशिव लोकसभा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणन्यासाठी महायुतीची नवक्रांती घडवीन्याचा संकल्प या महायुती महासंम्मेलनात झाला.

या युवा मेळाव्यात 18 ते 25 वायोगटातील तरुण  तरुणी देशाच्या नवनिर्मानाच्या या कार्यात उस्फुर्तपणे सहभागी होत आहेत व त्यामधून लोकशाही बळकट करण्याकरिता पहिल्यांदा मतदान करणार आहेत, यावेळी विविध कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील युथ आयकॉन नि आपले विचार प्रखर्तेने या मेळाव्यात मांडताना माझे मत विकासाला, माझे मत राष्ट्राला हा विचार करताना महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प सर्व युवकांणी केला.

महायुती मेळाव्यात मा. राहुल लोणीकर, प्रदेश अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, मा. सुरज चव्हाण,  प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मा. धनंजय सावंत, माजी जिल्हाउपाध्यक्ष, मा. नितीन काळे, माजी जिल्हाउपाध्यक्ष भाजप, मा. युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, मा. सुरज साळुंके, मा. जिल्हा प्रमुख शिवसेना, मा. युवा नेते शरदजी पाटील, मा. आकांक्षाताई चौगुले, मा. नितीन लांडगे, मा. अरुण पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, मा. श्रीकांत शिंदे, मा. अविनाश ठाकरे, मा. अमर पाटील, मा. शतनु खंदारे, मा. युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप, मा. दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मा. राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, यांचा सह मोठ्या संख्येने महायुतीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भाजपा युवा मोर्चा, युवा सेना, मनसे विद्यार्थी सेना,  आरपीआय, रासप व मित्रपक्षातील युवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.


 
Top