कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाला मागील काही दिवसा पूर्वी  नवीन 39  बस प्राप्त झाल्या पण कळंब आगाराला मात्र वरिष्ठाकडून वाटपात ठेंगाच दाखवण्यात आला आहे. केवळ दोनच शयनायान बस देऊन बोळवण केली.  यामुळे कर्मचाऱ्यासह प्रवाशात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज आहे. 

धाराशिव विभागात सर्वत्र जास्त उत्पन्नाचा बस आगार पण केवळ बसविना कळंब आगारात अवकाळात आली आहे. अनेक खुळखुळा झालेल्या बस गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत आहेत.  यात प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कळंब आगारात दैनंदिन फेऱ्या ह्या जवळपास 80 च्या आसपास आहेत तर कळंब आगारात सध्या 71 बस गाड्या आहेत. या सर्व फेऱ्यासाठी जवळपास 80 बस गाड्यांची आवश्यकता असते. परंतु बस गाड्या उपलब्ध नसल्यामुळे अनेक वाहक चालकांना रोजगार मिळत नाही. तर रोजगारासाठी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांत रोजच खटके उडतात. धाराशिव विभागाने कळंब आगाराला दोन स्लीपर कोच बस मागील काही दिवसांपूर्वी दिल्या आहेत. धाराशिव विभागातील उमरगा, भूम, तुळजापूर अशा आगारांनाच प्राधान्य दिले जाते. मग कळंब आगारानेच काय घोडं मारले का? असा प्रश्न प्रवाशातून विचारला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कळंब आगाराला तात्काळ नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात न दिल्यास प्रवासी मित्र संघटनेमार्फत डेपो पुढे धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही प्रवासी मित्र संघटनेने दिला आहे. 


काही दिवसांपूर्वी सुरू होणारी राज्यातील सर्वात मोठी गणली जाणारी यात्रा म्हणजे येरमाळा येडेश्वरी देवीची चैत्र वारी. या वारीसाठी महामंडळाच्या अनेक बसेस प्रवासी वाहतुकीसाठी लागतात. पण महामंडळाकडेच बस उपलब्ध नसल्यामुळे चैत्र वारीच्या प्रवासी वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामंडळ प्रवासी वाहतूक कशा पद्धतीने हाताळते याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. याबाबत अधिकाऱ्याशी संपर्क साधा असता त्यांचे चक्क कानावर हात ठेवले जात आहेत. 
 
Top