तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील गावावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असल्याने येत्या काळात गुन्हेगार प्रवृत्तीला चाप  बसणार असल्याने ग्रामस्थांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे विशेष म्हणजे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने प्रत्येक पालकांनी आपला मुलांवर जातीने लक्ष देऊन आपला मुलगा काय करतो तो कुणासोबत असतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे.                                                            

गेल्या काही दिवसापासून लहान मोठ्या घटनांमुळे  गावातील वातावरण दुषित होत आहे त्यातच कुठल्याही थोर महापुरुषांची जयंती मिरवणूक असो वा देवदेवतांची मिरवणूक असो अशा मिरवणुकीत काही समाजविघातक टवाळखोराकडून मागील भांडणाची कुरापती काढत भांडणे केली जात असत तसेच इतर वेळीही गावात कुठल्याना कुठल्या कारणावरून भांडणे , लावलेली बॅनर फाडण्याचे  प्रकार घडत होते तसेच भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते .त्याचबरोबर शाळा महाविद्यालये सुटल्यावर टवाळखोराकडून मोटारसायकल वर चक्रा मारुन शालेय मुलींना त्रात्रस देण्याचे प्रकारही वाढत असल्याने तेर ग्रामपंचायतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आमदार फंडातून गावातील महाराष्ट्र संत विद्यालय परिसरातील  छत्रपती संभाजी चौक. , छत्रपती शिवाजी महाराज चौक , नवीन बसस्थानक ,जुने बसस्थानक , मल्हार चौक , ग्रामपंचायत जवळ असे सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ग्रामपंचायत कार्यालयातून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे.


 
Top