धाराशिव (प्रतिनिधी)- 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत आहे. यामध्ये एका बाजूला सर्वसामान्य मतदार एकवटले असून या सर्वसामान्य नागरिकांनी व मतदारांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. सदर निवडणूक ही आपल्या हाती घेऊन ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. याचबरोबर प्रतिष्ठांना धक्का देण्यासाठी सर्वसामान्य नागरीक पुढे सरसावले असून आपल्या कष्टाच्या पैश्यामधून जमा केलेले पैसे निवडणूक निधी म्हणून देण्यात येत आहेत. 

आजपर्यंत जवळपास अडीच लक्ष रुपयापेक्षा जास्त एवढा निवडणूक निधी नागरीकांकडून उस्पुर्तपणे मिळालेला आहे. यामध्ये शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, मजूर, ड्रायव्हर, छोटे-मोठे व्यवसायिक यांनी जमेल तशा पद्धतीने सहकार्य करत निवडणूक निधी रोख स्वरुपात व चेकद्वारे दिला आहे. दि. 28/04/2024 रोजी बार्शी तालुक्यात आगळगाव येथे झालेल्या सभेमध्ये नागरिकांनी जवळपास 72 हजार रुपयांचा निधी दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वसामान्य नागरिक विरुद्ध प्रतिष्ठीत नेते अशी निवडणूक प्रथमत:च  जिल्हयात पाहिला मिळत आहे. यामध्ये शेतकरी वर्ग, नोकरदार यांचे मध्यमवर्गीय छोटे-मोठे व्यवसाय यांचे ओम राजेनिंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून स्वखर्चाने हे लोकप्रचारात सक्रिय झालेले पहावयास मिळत आहे.


 
Top