तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभा  निवडणूक व  लग्नांची लगीन  घाई, वाढते उष्णतामान पार्श्वभूमीवर सध्या शेतीच्या कामे काहीसे थंडावले आहेत. शेतमजुर प्रचारासाठी मजुरीने जात असल्याने उन्हान्हात शेतीचे कामे करण्यास कोण तयार नसल्याने शेती कामे पुर्णपणे मंदावली आहेत. शेतशिवारात चिटपाखरु ही फिरकनासे झाले आहे.

सध्या तापमान प्रचंड वाढुन चाळीस अंशावर पोहचले आहे. बळीराजा  गुढी पाडव्या शुभमुहुर्तावर, चार तास नांगरुन उन्हाळी शेती कामास आरंभ करतो. परंतु यंदा उन्हाळ्यात निवडणुक, लगीन घाई एकच आल्याने  या वर्षी परिस्थिती वेगळीच निर्माण  झाली. इहे, वाढती उष्णता, निवडणूक, मुळे रँली प्रचार सभेसाठी राजकिय पक्ष मजुरी पेक्षा अधिक पैसे मोजत असल्याने उन्हातान्हात दहा तास काम करण्यापेक्षा पाच ते सहा तास निवडणूक प्रचारात रँलीत फिरणे किंवा सभा ऐकणे एवडेच कमी कष्टाचे कामे असल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर शहराकडे प्रचारात येत आहे.  त्यामुळे शेतीकामास मजुर टंचाई जाणवत आहे. अत्यावश्यक करावे लागणारे कामे यंञाने अथवा शेतकरी अखे कुंटुंब करीत आहे.

सध्या गावगाड्यात  पाणीटंचाई व  चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे चालू कुळवाचे बैल विक्री केले आहेत. ज्यांच्याकडे बैलजोड आहेत. त्या शेतकऱ्यांनी उन्हाच्या कडाक्यामुळे शेती मशागत सुरु केली नाही. एप्रिल महिना निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नुकताच रमजान संपला असला तरी लगीन घाई, सप्ताहामध्ये व निवडणूकामध्ये शेतकरी रममान झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी मशागतीला उशीर होत असल्याने शेतकरी बैलाच्या मशागतीवर अवलंबून न राहाता शेतीची यंत्राच्या साह्याने कसत असून शेतातील मशागत यंत्रामुळे 'घंटो का काम मिनटो मे' होत असल्याने निवडणूक, लगीनगाईमुळे शेतकऱ्यांनी

मरगळ घेतली आहे. त्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे शेती मशागतीची कामे बंद आहेत. शेतकऱ्याकडे बैल आहेत पण शेतीची कामे या तापमानात करणे शक्य नाही. तापमान कमी झाले तर बैलानी मशागत करायची अन्यथा यंत्राच्या साह्याने झटपट उरकुन घ्यावी लागणार आहेत. एकदंरीत पाच मे पर्यत ग्रामीण भागात मजुर टंचाई जाणवणार आहे यात वाद नाही. दुष्काळ नंतर अवकाळी पाऊस आता निवडणुकमुळे मजूर टंचाई यामुळे शेतकरी वर्गास शेती कसणे वर्षानुवर्ष ञासदायक ठरत आहे.


 
Top