कळंब (प्रतिनिधी)- बस स्थानकालगत असलेल्या बाजार मैदानातील मच्छी विक्रेते हे सडलेली मच्छी बस स्थानकाच्या भिंतीलगत फेकल्यामुळे बस स्थानकातील कर्मचारी व प्रवासी या दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून बसावे लागत आहे. तर कर्मचाऱ्यांचा जीव मात्र या दुर्गंधीमुळे टांगणीला लागला आहे. याची दखल घेऊन  एसटी महामंडळाने तातडीने  नगरपरिषदेला पत्र देऊन मच्छी विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करावी व मच्छी बाजार कळंब शहराबाहेर सुरू करावा अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेकडे पत्र देऊन केली आहे.  यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिकृत असे की, कळंबच्या बस स्थानक शेजारी शहराचा नगरपरिषदेचा आठवडी बाजार भरत असून या बाजारात अनेक व्यवसायिक आपले दुकाने थाटून व्यवसाय करतात. अशातच मच्छी विक्रेत्यांनी याच बाजारात आपले बस्तान बसवून दररोज मच्छी विक्री करून सडलेली मच्छी एसटीच्या भिंतीलगत फेकून देऊन निघून जातात. त्यामुळे या सडलेल्या मच्छीचा दुर्गंध सर्व बस स्थानकात व आगारात पसरल्यामुळे तेथे काम करणारे कर्मचारी व वाहक, चालक हे मात्र चांगलेच हैराण झाले आहेत. या दुर्गंधीमुळे वाहक चालकांना विश्रांती घेता येते, ना दुपारचे जेवण करता येते. या उग्रवासामुळे बस स्थानकातील प्रवासी सुद्धा नाकाला रुमाल बांधून वेळ घालवत आहेत. या अशा उग्र वासामुळे प्रवाशांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. याकडे राप प्रशासनाने दखल घेऊन आज एसटी प्रशासनाने थेट धाव घेऊन मुख्याधिकारी यांना पत्र देऊन मच्छी विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई तातडीने करावी व मच्छी विक्रेत्याचा व्यवसाय कळंब शहराबाहेर करावा अशी मागणी केली. यावेळी कर्मचारी व प्रवाशांच्यावतीने मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदन देतेवेळी स्थानक प्रमुख आनंत कवडे, वरिष्ठ लिपिक प्रभाकर झांबरे, वाहक धाट, मते, संध्या राणी सोनटक्के आदी चालक, वाहक यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती.


 
Top