नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे दि.21 एप्रिल रोजी जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणुक काढण्यात आली.

सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथे जैन समाज बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी बसस्थानक ते भगवान महावीर चौकापर्यंत फुलांनी सजविलेल्या रथामधुन भगवान महावीर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणुक काढण्यात आली. बसस्थानकासमोरून निघालेली मिरवणुक लोकमान्य वाचनालय, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शास्त्री चौक,जयभवानी चौक, बसवेश्वर चौक, चावडी चौक मार्गे मिरवणुक महावीर चौकात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.

या मिरवणुकीमध्ये जैन समाजाचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, प्रविण कासार,सुधीर पाटील, किरण पाटील,अक्षय आवटे यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. मिरवणुक चावडी चौकात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मिरवणुक अतीशय शांततेत पार पडली.


 
Top