धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक श्री.प्रदीप डुमडुम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा आढावा घेऊन निवडणुकीच्या कामाकरिता घटित विविध कक्षांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,खर्चविषयक नोडल अधिकारी सचिन इगे,राज्य उत्पादन शुल्कचे बारगजे तसेच खर्चविषयक कक्षाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री.डुमडूम यावेळी म्हणाले, निवडणुकीच्या कामात प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात. कोणतीही तक्रार येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.निवडणुकीतील खर्चविषयक बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे. उमेदवाराचा जो प्रत्यक्षपणे खर्च होतो ती माहिती उपलब्ध करून घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची तसेच विविध नोडल अधिकारी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. इगे यांनी सादरीकरणातून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची विस्तृत माहिती श्री डुंगडुंग यांना दिली. 

विविध कक्षांना भेटी

आढावा बैठकीनंतर श्री.डुंगडुग यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन समिती इमारतीत असलेल्या विविध कक्षांना भेटी दिल्या.यावेळी त्यांनी सी-व्हीजील अँप कक्ष, विविध परवाने व चौकशी कक्ष (एक खिडकी), नामनिर्देशन कक्षाला भेट देऊन तेथे स्थापन करण्यात आलेला उमेदवारांचे फोटो,फोटोंचे घोषणापत्र स्वीकारणे व निदेश पुस्तिका खर्चाचे पुस्तक उपलब्ध करून देण्याबाबतचा कक्ष, नामनिर्देशन तपासणी कक्ष,नामनिर्देशक दैनंदिन अहवाल कक्ष, अनामत रक्कम जमा करणे कक्ष, मतदार यादी कक्ष व कोरे नामनिर्देशन अर्ज तसेच शपथपत्र व इतर नमुने उपलब्धता कक्षाला भेट दिली व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामकाजाची माहिती जाणून घेतली.

तसेच नियोजन समिती इमारतीत असलेल्या खर्च सनियंत्रण कक्ष, तक्रार निवारण व मतदार मदत व नियंत्रण कक्ष तसेच माध्यम प्रमाणीकरण व सानियंत्रण कक्षाला सुद्धा भेट दिली व कामकाजाची माहिती  त्यांनी जाणून घेतली व काही उपयुक्त सूचनाही केल्या.

त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी श्री.जाधव,खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी श्री. इगे,श्री.झाडे,श्री.खडसे तसेच संबंधित विभागाचे इतरह नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.


 
Top