परंडा (प्रतिनिधी) -परंडा शहर व पंचक्रोशीतील सर्व स्वामी भक्तांना कळविण्यास आनंद होतो की. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा चैत्र शुद्ध द्वितीया वार बुधवार दि.10/4/2024 रोजी श्री स्वामी समर्थ मंदीर समर्थनगर परंडा येथे साजरा करण्यात येणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. 

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स.6 ते 8 श्री स रुद्राभिषेक, स.9 ते 10 सामुहिक श्री स्वामी समर्थ नामजप, स.10:30 ते 12:30 बाल कीर्तनकार चि. वेदांत देशपांडे मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर यांचे कीर्तन, दु.12:30 ते 1:30 महाआरती माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. 

दु.1:30 ते 4:00 महाप्रसाद,सायं. 5 ते 7 श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचे भजन,रात्री. 8 ते 10 विनोदमुर्ती श्री.पोपट ढमाळ व सहकारी पुणे यांचे नाथ सांप्रदायिक भारूड होईल.रात्री. 10:30 श्री स्वामी समर्थ पुरुष भजनी मंडळाचा जागर असे कार्यक्रम होणार आहेत. सदरील कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ कृपा आशीर्वाद संस्था व समस्त नागरिक समर्थ नगर यांनी आवाहन केले आहे.


 
Top