तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मातेच्या चैञी  पोर्णिमेनिमित्त मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी राञी छबिना काढण्यात आल्या. नंतर महंत तुकोजीबुवा यांनी आपल्या उपरण्यात जोगवा मागीतल्यानंतर  चैत्री पौर्णिमा विधीची सांगता झाली.

मंगळवार राञी श्रीतुळजाभवानी मंदिरात प्रांगणात  सिंह वाहनावर काढण्यात आला. नंतर देविचे महंत तुकोजी बुवा यांनी  मंदिर प्रांगणात आपल्या उपरण्यात जोगवा  मागीतल्या नंतर चैञी पोर्णिमा दिनाच्या धार्मिक विधीचा सांगता झाला. यावेळी महंत वाकोजीबुवा, सेवक गोविंद तेलकडी, प्रक्षाळ मंडळाचे सेवेदार उपस्थितीत होते. 
Top