धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील व बाहेरील साखर कारखान्यांकडे ऊस पुरवठा केला आहे. साखर कारखाने बंद होवून 15 दिवस झाले. एवढा कालावधी होवून देखील जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाची पहिली उचल अद्याप दिली नाही. साखर आयुक्तांनी सदर साखर कारखान्यांना सुचना द्यावी. कारखान्यांनी उचल न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

साखर आयुक्त कार्यालय पुणे यांना पाठविलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की,  उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील साखर कारखान्यांकडे ऊस पूरवठा केलेला आहे. साखर कारखाने बंद होऊन पंधरा दिवसाचा कालावधी लोटला आहे. एवढा कालावधी जाऊनही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्याची ऊसाची पहिली उचल अद्यापपावेतोपर्यंत दिलेली नाही.अनेक कारखान्यांनी 15 जानेवारी पर्यंतची पहिली उचल अदा केलेली असून 15 जानेवारी नंतर गेलेल्या ऊसाची पहिली उचल मिळालेली नाही.

तरी येत्या चार दिवसात ऊसाची पहिली उचल साखर कारखान्यांनी देणेसंदर्भात आपण आदेशीत करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.


 
Top